MPSC Tax Assistant Update – MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?

Mpsc Tax Assistant Update – कर सहायकपदाच्या नसलेल्यांचीदेखील नावे आल्याने एमपीएससीच्या हेतूवर संशय .
बोगस कारभार पुन्हा समोर, जबाबदार अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मागणी

MPSC Tax Assistant

MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा (एमपीएससी) बोगस कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एमपीएससीने सोमवारी (दि. १५) कर सहायकपदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या निकालात अर्ज न केलेल्या उमेदवारांचे नावे मुख्य परीक्षेच्या निवड यादीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्ज न केलेल्या उमेदवाराचे नाव आल्याने एमपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले असून हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.

एमपीएससीने गेल्या काही दिवसांत विविध परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत, वातील काही निकालांमध्ये एमपीएससीने जाहीरातीत ननूद केलेल्या नियमानुसार निकाल लावले नाहीत, पसंतीक्रम या पर्यायाचा विचार न करता निकाल जाहीर केला, त्यामुळे ऑप्टिंग आऊट या पर्यायासाठी बोली लागल्याची माहिती समोर आली होती, त्यावर एमपीएससीने कोणताही खुलासा केलेला नाही. असे असताना एमपीएस्स्सीने गेल्या वर्षी अराजपत्रित गट क संवर्गाच्या तब्बल ७५०० पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यातील करसहायक पदाचा निकाल सोमवारी (दि. १५) जाहीर करण्यात आला. या पदाचा निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या यादीमध्ये भलतीच नावे आल्याने मोठा धक्का स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे.

एमपीएससीच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, तो प्रकार आता घडला आहे. ज्या उमेदवारांनी कर सहायक पदासाठी अर्जच केले नाहीत, अशा उमेदवारांची नावे थेट निवड यादीमध्ये आली आहेत. त्यामुळे निकाल लावताना एमपीएससीचे संबंधित अधिकारी शुद्धीवर नव्हते का? अर्ज न केलेल्या उमेदवारांची निवड कशी केली गेली? यासाठी कोणी अर्थिक व्यवहार केले आहेत काय?

एमपीएससीकडून दुस-यांदा अशी झाली चूक

एमपीएससीने या आधीही अशीच चूक केली आहे. २०२२ च्या पोलीस उपनिरीक्षक ( MPSC PSI ) पदाच्या PSI PRI पूर्वपरीक्षा निकालातही गोंधळ घालण्यात आला होता, या पदासाठी पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र करण्यात आले होते, त्यावर स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी आक्षेप घेतला घेवून हा प्रकार समोर आणला होता. तेव्हा प्रशासकीय कारण देऊन निकाल मागे घेण्याची नामुष्की एमपीएससीवर ओढवली होती.

जबाबदारी झेपत नसेल तर राजीनामा द्या…

( Tax Assistant ) करसहायक पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण न करणारे उमेदवार ज्यानी मुख्य परीक्षा-२०२३ अर्ज केवळ ( Lipik Tanklekhak ) लिपिक टंकलेखकसाठी केला आहे. त्यांचे नाव कर सहायक कौशल्य चाचणीसाठी पात्र उमेदवाराच्या यादीत आले आहे. म्हणजेच ज्यांनी कर सहायक मुख्य परीक्षा २०२३ साठी अर्ज केला नाही, तरी ते पास झाले आहे. हा प्रकार भयंकर असून एमपीएससीकडून अशी चूक कशी काय होऊ शकते? त्यामुळे आता एमपीएससीच्या हेतूवर संशय येऊ लागला आहे.

या जाहिरातीमध्ये लिपिक संवर्गात्साठी ७,०३५, ( mpsc Tax Assistant)कर सहायकसाठी ४६८, तांत्रिक सहायक १ आणि राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकसाठी ६ जागा नमूद करण्यात आल्या होत्या. आयोगाकडून एप्रिल २०२३ मध्येएमपीए‌ससीकडून नियमबाह्य पध्दतीने निकाल लावण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत, एमपीएससी याआधी चुकीच्या प्रश्नोत्तरांसाठी तसेच प्रश्नच रद्द करण्यासाठी प्रसिद्ध होती, पण आता थेट निकालप्रक्रियेत गोंधळ घातला जात आहे. परीक्षांचे आयोजन करणे, निकाल लावणे याची जबाबदारी एमपीएससीच्या सचिवांचे असते. तसेच उपसचिव जे आता एमपीएससीच्या बेकायदा परीक्षा नियंत्रक पदावर बसले आहेत, त्यांची ही सर्व जबाबदारी आहे. जर एमपीएससीतील पदांची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी थेट राजीनामा द्यावा, तत्सेच एमपीएससीच्या अध्यक्षांनी अशा प्रकाराला खतपाणी न घालता जबाबदारी स्वीकारुन खुलासा करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची मुख्य परीक्षा १७ डिसेबर २०२३ रोजी पार पडली होती, त्यापैकी दुय्यम निरीक्षक आणि तांत्रिक सहायक पदाचे निकाल यापूर्वी लावण्यात आले आहे. कर सहायक कौशल्य चाचणीसाठी अपात्र असताना उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले आहे.

एकही प्रमाणपत्र नसणारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कर सहायकसाठी हे आरक्षण लागू नसतानाही त्यांना स्थान मिळाले.त्यामुळे एमपीएससीच्या कारभारावर आणि हेतूवर संशय घेतला जाऊ लागला आहे, एमपीएससी ही एकच अशी संस्था राज्यात आहे की तिच्या कार्यपद्धतीवर कोणी संशय येवू शकत नाही, एमपीएससीने कोविडकाळात यशस्वी परीक्षांचे आयोजन एक आदर्श निर्माण केला आहे. तसेच परीक्षाप्रक्रिया सुरळीत पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांचा एमपीएससी वर विश्वास आहे, पण गेल्या काही दिवसांपासून एनपीएससीतील परिस्थिती बदलली असून संशयाचे बाताबरण निर्माण झाले आहे.

Mpsc Tax Assistant Update मध्ये आपण वरील प्रमाणे माहिती पाहिली आहे. Mpsc बद्दल विविध माहिती आपण पुढील ब्लॉग मध्ये पाहणार आहे .

अशाच प्रकारच्या माहिती साठी All Marathi News ला भेट द्या.

source

Leave a comment