महाराष्ट्रातील Shikshak Bharti Latest News – शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक –

पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.
दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.
तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे.त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात शिक्षक नियुक्तीला हिरवा कंदील
शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. शिक्षण विभागाने शाळांमधील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची शिफारस केली होती. मात्र, लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागल्याने एक महिन्यापासून नियुक्ती प्रकिया रखडली होती.
दरम्यान, शिक्षण विभागास शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची शुक्रवारी परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार ज्याजिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.
पवित्र पोर्टलमार्फत दिनांक २५ फेब्रुवारीला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावरसुरू करण्यात आली होती.
दरम्यान, निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निबंध आले.
तथापि या विषयाची तातडी, तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने राज्य शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता.
महाराष्ट्रातील वरती आपण Shikshak Bharti Latest News व शिक्षक भरती अपडेट पहिली .
अशाच माहिती साठी All Marathi News ला भेट द्या.