Mpsc म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये दर वर्षी बरेच जन वेग वेगळ्या परीक्षांसाठी फॉर्म भरतात आणि परीक्षा देतात . आज आपण Tax Assistant Update पाहणार आहे.

MPSC – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अजब कारभाराची प्रचीती उमेदवारांना आली आहे. कर सहाय्यक TAX ASSISTANT पदासाठी अर्ज केलेला नसतानाही मुख्य परीक्षेच्या निवड यादीत काही उमेदवारांचे नाव असल्याचे आढळून आले. यादरम्यान या गोंधळामुळे इतर उमेदवारांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयोगाने दुरुस्तीसह निकाल पुन्हा जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.

साडेसात हजार पदांसाठी याद्वारे भरती केली जाणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार आयोगाने एप्रिल २०२३ मध्ये पूर्व परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा १७ डिसेंबरला घेण्यात आली. यात लिपिक संवर्गासाठी सात हजार ३५, कर सहायक पदासाठी ४६८, तांत्रिक सहाय्यक एक आणि राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकसाठी सहा जागा नमूद केलेल्या होत्या.दुय्यम निरीक्षक व तांत्रिक सहाय्यक या पदांचे निकाल आधीच जाहीर झालेले आहेत.

कौशल्य चाचणीसाठी अपात्र उमेदवार पात्र

एकही प्रमाणपत्र नसणारे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन उमेदवार प्रवर्गासाठी आरक्षण लागू नाही, तसेच एक प्रमाणपत्र असून, पात्र ठरलेले उमेदवार कर सहाय्यकसाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्रे आवश्यक असतानाही पात्र केले आहेत. तसेच, दोन्ही प्रमाणपत्रे असलेले; परंतु कर सहाय्यक पूर्व परीक्षाच उत्तीर्ण नाहीत, असे उमेदवारही पात्र ठरविले आहेत.

पीएसआय परीक्षेतही अशीच होती चूक

यापूर्वी २०२२ मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदासाठी झालेल्या पूर्व परीक्षेच्या निकालात अशीच चूक झाली होती. पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र नसलेले खेळाडू उमेदवार पात्र ठरविण्यात आले होते. यासंदर्भात उमेदवारांनी आवाज उठविल्यावर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निकालात दुरुस्ती करताना सुधारित निकाल जाहीर केला होता. या चुकीची पुनरावृत्ती झालेली असून, आयोगाने सुधारित निकाल प्रसिद्ध करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कर सहाय्यकपदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण न करणारे तसेच फक्त 66 टंकलेखकपदासाठी मुख्य परीक्षेचा अर्ज केलेल्या उमेद‌वारांचीही नावे कर सहाय्यक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविली आहेत. याचा अर्थ कर सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी अर्ज केलेला नसतानाही असे उमेदवार उत्तीर्ण ठरविले आहेत. या गोंधळामुळे इतर उमेदवारांचे नुकसान होऊ शकते.

MPSC ने सुधारित निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.पदासाठी निकाल जाहीर करण्यात आला. यात कर सहाय्यकपदासाठी अर्जच केलेले नाहीत, अशा उमेदवारांच्या नावांचा निवड यादीत समावेश असल्याने सर्वांचे डोळे चक्रावले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

वरती आपण tax assistant update बद्दल माहिती पाहिली . अशीच माहिती आपण नंतर सुद्धा पाहणार आहे . जास्त माहितीसाठी All Marathi News वर माहिती पाहा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *