नमस्ते मित्रांनो, आज आपण जिल्हा परिषद आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न पाहणार आहे. परीक्षेमध्ये Arogya Sevak Tantrik Question खूप महत्वाचे आहेत.
आरोग्य सेवक या पदासाठी तांत्रिक प्रश्न खूप महत्त्वाचे असतात. परीक्षेमध्ये आरोग्य सेवक या पदासाठी 100 प्रश्न असतात, आणि त्यातील जे 40 प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्नावर आहेत. त्यामुळे तांत्रिक प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. पुढे आपण आरोग्य सेवक पदासाठी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहे.
Arogya Sevak Tantrik Question in Marathi | आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न
1 प्रश्न: परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण होते?
उत्तर: सर आयझॅक न्यूटन.
2 प्रश्न. ग्रहांच्या गतीविषयक तीन नियम कोणी मांडले.
उत्तर जोहान्स केपलर
3 प्रश्न: केप्लरच्या ग्रहांच्या गतीविषयक तिसऱ्या नियमानुसार सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहांच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या ……. ला समानुपाती असतो:
उत्तर. घनाला.
4 प्रश्न: G या वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाचे मूल्य सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले?
उत्तर: हेनरी कॅव्हेडिश
5 प्रश्न: वजनाचे एसआय एकक काय आहे?
उत्तर : न्यूटन.
6 प्रश्न: मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या ….. चे आवृत्ती फुल असतात
उत्तर: अनुवस्तुमान
7 प्रश्न : आधुनिक आवर्त सारणीत उभ्या ओळींना …….. असे म्हणतात आणि त्यांची संख्या ……. एवढी असते?
उत्तर: गण, 18
8 प्रश्न: आधुनिक आवर्तसारणी एकूण किती खंडांमध्ये विभागलेली आहे?
उत्तर: 4
9 प्रश्न :ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थांमध्ये मात्र कोणताही रासायनिक बदल होत नाही अशा पदार्थाला ……… म्हणतात?
उत्तर: उत्प्रेरक
10 प्रश्न: पेशींमधील श्वसनादरम्यान …….. अभिक्रिया घडत असते ?
उत्तर : रेडॉक्स अभिक्रिया
11 प्रश्न: एक किलोवॅट तास ऊर्जा म्हणजे किती?
उत्तर: 3.6*10^6J
12 प्रश्न : भारतातील प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता किती असते?
उत्तर: 50 Hz
13 प्रश्न: विद्युतधारेचे SI पद्धतीतील एकक काय आहे?
उत्तर: अँपियर
14 प्रश्न : किती डिग्री तापमानाला पाण्याची घनता सर्वाधिक असते ?
उत्तर: 4 डिग्री सेल्सिअस
15 प्रश्न: उष्णतेचे सीजीएस पद्धतीतील एकक काय आहे?
उत्तर : कॅलरी
16 प्रश्न: प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असताना त्याची दिशा बदलते, त्याला प्रकाशाचे ……. म्हणतात?
उत्तर: अपवर्तन
17 प्रश्न : ‘तार्यांचे लुकलुकणे’ आणि सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो ही कशाची उदाहरणे आहेत?
उत्तर : प्रकाशाचे अपवर्तन
18 प्रश्न: भिंगाच्या शक्तीचे एकक ……. हे आहे?
उत्तर: डायॉप्टर
19 प्रश्न: मानवी डोळ्याच्या कोणत्या भागातून प्रकाश आत प्रवेश करतो?
उत्तर: पारपटल
20 प्रश्न: निरोगी मानवी डोळ्याचे स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर …….. असते?
उत्तर: 25 सेंटीमीटर
21 प्रश्न: लघुदृष्टीचा किंवा निकटदृष्टीचा असलेल्या व्यक्तींना कोणत्या प्रकारचा चष्मा दिला जातो?
उत्तर : ऋण शक्तीचा अंतर्गोल भिंगाचा
22 प्रश्न: साध्या सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने वस्तूची ……. पट मोठी प्रतिमा मिळवता येते?
उत्तर: 20
23 प्रश्न: आपल्या डोळ्यासमोरून वस्तू दूर केल्यानंतरही किती सेकंदापर्यंत वस्तूच्या प्रतिमेची दृष्टीपटलावर परिणाम तसाच राहतो?
उत्तर : 1/16 सेकंद
24 प्रश्न: IUPAC याचे विस्तारित रूप काय आहे?
उत्तर : International Union Of Pure And Applied Chemistry
25 प्रश्न: ज्या कार्बनी संयुगातील दोन कार्बन अणु मध्ये मध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंद असतो, त्यांना ……. म्हणतात?
उत्तर : असंपृक्त संयुग
26 प्रश्न : अवकाशात जाणारा पहिला मानव युरी गागारीन हा कोणत्या देशाचा होता?
उत्तर: रशिया
27 प्रश्न: 1984 साली अवकाशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय ?
उत्तर: राकेश शर्मा
28 प्रश्न: अवकाशात पाठवण्यात आलेल्या जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव काय होते?
उत्तर: स्पुटनिक वन
29 प्रश्न: भूस्थिर उपग्रह ( Geostationary Satellite) हे भूपृष्ठापासून किती किलोमीटर उंचीवर असतात ?
उत्तर: 35780 किमी
30 प्रश्न : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची ( ISRO ) स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
उत्तर : 1969
Credit: Arogya Sevak Tantrik Question in Marathi
Download pdf – Arogya Sevak Tantrik Prashna
तर अशा प्रकारे आपण महत्वाचे Arogya Sevak Tantrik Question व आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न pdf वरती पाहिली आहे.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी ALL MARATHI NEWS ला भेट द्या.