एमपीएससीला शासन आदेशच समजेना – MPSC Update
कर सहायकपदाला अर्ज न करताही निवड यादीला आले नाव, उमेदवारांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिले पण एमपीएससीला शक्य होईना.
ज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या शासन आदेशानुसार लिपिक-टंकलेखक या पदासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक नाही, तसेच टंकलेखनाचे (टायपिंगचे) मराठी किंवा इंग्रजी या भाषेतील एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश केवळ लिपिक-टंकलेखक या पदासाठीच लागू आहे. मात्र असे असतानादेखील एमपीएससीने कर सहायक पदासाठी हेच नियम लागू केल्याने ज्यांना या पदासाठी अर्ज केले नाहीत, अशा उमेदवारांची नावे कौशल्य चाचणीच्या यादीत आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी एमपीएससीच्या कारभारावर संताप व्यक्त केला असून ४ सप्टेंबर २०१५ चा शासन आदेशाचा अभ्यास करण्याचा सल्ला सचिवांना दिला आहे.
MPSC Update -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक साहाय्यक, कर साहाय्यक, लिपिक टंकलेखक या पदासांठी एकूण ७,५०९ जागांसाठी घेण्यात आली, या पदापैकी लिपिक-टंकलेखक या पदासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेपैकी कोणतेही एक टायपिंग प्रमाणपत्र असले तरी संबंधित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत होता.
मात्र कर साहाय्यक या पदासाठी या दोन्ही भाषेतील प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र असले तरच अर्ज करता येत होता, पदभरतीच्या जाहिरातीत दिलेल्या अटीनुसार पात्र असल्यास उमेदवार अर्ज करतात. त्यामुळे ज्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज केलाच नाही, त्याचे नाव त्या पदाच्या भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यामध्ये येण्याचा संबंधच येत नाही. मात्र एमपीएससीने कर साहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी जी यादी जाहीर केलेली आहे, त्या यादीमध्ये या पदासाठी पात्र नसलेल्या उमेदवारांचीदेखील नावे जाहीर केली आहेत,
एमपीएससीने दाखवली शासन आदेशाला केराची टोपली
परीक्षांचा निकाल आणि इतर विषयांवर माध्यमांमध्ये दूत प्रसिद्ध झाल्यानंतर बंधनकारक असूनही खुलासा टाळला
मुलाखती रखडलेल्या परीक्षा:
असा आरोप इतर उमेदवारांनी केला असून त्या संदर्भातील सविस्तर माहितीचा मेल एमपीएससीला केला आहे. मात्र एमपीएससीकडून यासंदर्भात कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.
एमपीएससीला पाठववेल्या मेलला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याच विषयाशी संबंधित सविस्तर मेल केला आहे. त्याची तत्काळ दखल घेऊन आपल्या मेलची माहिती मिळाली असून ती सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आली आहे, असा
प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना मेल केल्यानंतर कोणत्यातरी स्वरूपात प्रतिसाद मिळाला याचे समाधान संबंधित उमेदवारांना आहे. मात्र एमपीएससीला मेल किंवा फोन करूनही सचिवांकडून तसेच संबंधित कार्यालयातील जनसंपर्क अधिकाऱ्याकडून प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे एमपीएससीने जाहीर केलेल्या निवड यादीत जाणीवपूर्वक गोंधळ तर घातला जात नाही ना, तसेच मर्जीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, या प्रश्नांनी उमेदवार तणावात आले आहेत.
उमेदवारांनी केलेल्या मेलमध्ये आहे ही माहिती
एमपीएससीकडून महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३
MPSC Update कर साहाय्यक या पदाच्या टायपिंग कौशल्य चाचणीसाठीचा निकाल १५ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत. कर साहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी पात्र नसताना पात्र ठरविण्यात आलेले उमेदवार:
फक्त एकच टायपिंगचे प्रमाणपत्र असणारे उमेदवार, कर साहाय्यक पदासाठी ज्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहेत, तरीही कर साहाय्यक पदासाठी पात्र केले आहेत. ही सर्वात मोठी त्रुटी आहेत.
एकही टायपिंग प्रमाणपत्र नसणारे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन उमेदवार, माजी सैनिक कर साहाय्यकसाठी पात्र केले गेले आहेत, पण हे आरक्षण २०१५ च्या शासन आदेशानुसार कर साहाय्यक पदासाठी लागू नाही. म्हणून ते अपात्र असायला हवेत.
दोन्ही प्रमाणपत्र आहेत पण कर साहाय्यक पूर्व परीक्षा ज्या उमेदवारांनी पास केलेली नाही ते सुद्धा पात्र ठरवले आहेत.
या आपण त्रुटी दुरुस्त करून लवकरात लवकर कर साहाय्यकपदाचा निकाल पुन्हा नव्याने जाहीर करावा,
४ सप्टेंबर २०१५ चा शासन आदेश
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, १९९१ चे जनगणना
कर्मचारी, १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना, जर त्यांना लिपिक टंकलेखक पदावर नियुक्ती मिळाली, तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिने इतक्या कालावधीची मुदत शासननिर्णय दिनांक ६.१०.२०१० अन्वये देण्यात आली आहे.
मराठी टंकलेखनाची परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून एका वर्षातून दोन वेळा (मे / जून व नोव्हेंबर डिसेंबर) महिन्यात आयोजित केली जाते. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत सदर परीक्षेचा निकाल घोषित केला जातो. सदर परीक्षेस बसण्याकरिता उमेदवारांनी किमान साडेपाच महिन्यांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. या बाबी विचारात घेता टंकलेखनाच्या अर्हता प्राप्तीकरिता सध्या असलेला सहा महिन्यांचा अवधी पुरेसा नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
MPSC Update कर साहाय्यक या पदाच्या टायपिंग कौशल्य चाचणीसाठीचा निकाल १५ एप्रिल २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत. कर साहाय्यक टायपिंग कौशल्य चाचणीसाठी पात्र नसताना पात्र ठरविण्यात आलेले उमेदवार:
फक्त एकच टायपिंगचे प्रमाणपत्र असणारे उमेदवार, कर साहाय्यक पदासाठी ज्यास मराठी आणि इंग्रजी दोन्ही टंकलेखन प्रमाणपत्र आवश्यक आहेत, तरीही कर साहाय्यक पदासाठी पात्र केले आहेत. ही सर्वात मोठी त्रुटी आहेत.
तसेच काही MPSC Update न्यायालयीन प्रकरणी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार ही मुदत वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार आदेश काढण्यात आला आहे.
त्यानुसार शासन निर्णय प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, स्वातंत्र्यसैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, १९९१ चे जनगणना कर्मचारी, १९९४ नंतरचे निवडणूक कर्मचारी व पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन कर्मचारी या सर्व घटकातील उमेदवारांना, जर त्यांना लिपिक टंकलेखकपदावर नियुक्ती मिळाली, तर टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून ६ महिने असलेली मुदत वाढवून २ वर्षे इतकी करण्यात येत आहे.
More mpsc info- MPSC
वरती आपण MPSC Update mpsc tax assistant ची माहिती पहिली.
अशाच माहितीसाठी All Marathi News ला भेट द्या.