Explore Important Articles Indian Constitution in Marathi.

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर ( Dr Babasaheb Ambedkar ) हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.( बॅ. जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले- डाॅ. आंबेडकर ) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. Important Articles Indian Constitution राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. आज आपण भारतीय घटनेतील प्रमुख कलमे म्हणजेच Important Articles of Indian Constitution मराठी मध्ये पाहणार आहे.

भारतीय राज्यघटनेतील घटनेतील प्रमुख कलमे - Important Articles of Indian Constitution

भारतीय राज्यघटनेतील घटनेतील प्रमुख कलमे – Important Articles of Indian Constitution

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. – पदव्या संबंधी

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. – राज्यपालाची पात्रता

कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. – उच्च न्यायालय

कलम २३३. – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्तआयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. – राज्य आणीबाणी

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती

कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता

Important Articles Indian Constitution in Marathi

भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचे कलम –

घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

मूलभूत अधिकार माहिती –

मूलभूत अधिकार ( कलम 12 ते 35) Important Articles Indian Constitution –
असे अधिकार जे व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे संरक्षण आणि त्यांचा विकास हेच ध्येय असतो. हे अधिकार भौतिक, मानसिक, नैतिक विकासाकरिता महत्त्वपूर्ण असतात. यामुळे व्यक्तीचा विकास तर होतोच देशाचाही विकास होतो. संविधानामध्ये याला सर्वोच्च स्थान आहे.

भाग – ३ मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील मुलभूत अधिकारांची सनद आहे. ही सनद भारतीयांना भारतीय नागरिक म्हणून त्यांचे आयुष्य शांतता व समानतेने व्यतीत करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मुलभूत हक्कांमध्ये कायद्यापुढे समानता, उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य, आणि नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी habeas corpus यासारख्या याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान संहितेखाली शिक्षा होऊ शकते. मुलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मुलभूत हक्कांची व्याख्या केली जाऊ शकते. हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात, संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत. काही बंधने वगळता हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत. इंग्लंडचे हक्कांविषयीचे विधेयक, अमेरिकन संयुक्त राज्यांचे हक्कांविषयीचे विधेयक, आणि फ्रान्सचे माणसाच्या अधिकाराच्या घोषणा यांमध्ये भारताच्या मुलभूत अधिकारांचे मूळ आहे.

वरील प्रमाणे आपण भारतीय घटनेतील प्रमुख कलमे म्हणजेच Important Articles of Indian Constitution हे पहिले आहे. तसेच महत्वाचे मुलभूत अधिकार पहिले . Important Articles Indian Constitution मध्ये जेवढी कलमे आहेत त्याची माहिती वरती दिली आहे.

Read more on All Marathi News.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *